उष्णतेच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण कोल्ड्रींग पिण्यास प्राधान्य देतात.



पण बऱ्याच जणांना माहिती नसते की त्याचे जास्त सेवन करणं हे शरीरासाठी धोकादायक ठरु शकते.



रिपोर्टनुसार, एका कोल्ड्रींगच्या बॉटलमध्ये दहा चमचे साखर असते.



ग्रॅममध्ये मोजायची झाली तर यामध्ये एकूण 39 ग्रॅम साखर असते.



तर ऑरेंज सोड्यामध्ये जवळपास 12 चमचे साखर असते.



जर तुम्ही पॅकिंगवाले अॅप्पल ज्यूस पीत असाल तर त्यामध्ये जवळपास 10 चमचे साखर असते.



इतकचं नव्हे तर एनर्जी ड्रींकमध्येही भरपूर प्रमाणात साखर असते.



त्यामुळे कोल्ड्रींग पिल्याने जितकी मजा येते तितकचं त्यामुळे नुकसान देखील होतं.



यामुळे तुम्हाला यकृताची देखील समस्या निर्माण होऊ शकते.



म्हणूनच कोल्ड्रींगचे सेवन नेहमी कमी प्रमाणात करावे.