आयपीएल 2022 च्या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जला 9 विकेट्स राखून पराभूत केलं. पंजाबविरुद्ध सामन्यानंतर वॉर्नरनं आपल्या मुलांबद्दल असे काही बोललं, ज्याची सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा होत आहे. बाबा तुम्ही जोस बटलरसारखं शतक का झळकावत नाही? असा प्रश्न डेव्हिडच्या मुलींनी त्याला विचारला आहे. दिल्लीच्या फरकी गोलंदाजांनी आधी पंजाबच्या फलंदाजांना अडकवले, त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी पंजाबच्या गोलंदाजांना धू धू धुतले. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी हैदराबादच्या संघानं डेव्हिड वार्नरला रिलीज केलं. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्लीच्या संघानं त्याच्यावर बोली लावली. आयपीएलचा हंगाम डेव्हिड वार्नरसाठी चांगला ठरत आहे.