दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स प्रभावित झाला आहे.



कार्तिकला पाहून त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा झाली आहे.



दिनेश कार्तिकनं स्वबळावर आरसीबीच्या संघाला दोन-तीन सामने जिंकले आहेत



तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याचा फॉर्म कुठून आला? हे मला माहीत नाही. कारण, त्यानं यापूर्वी फारसे क्रिकेट खेळलेले नाही. तो मैदानात सर्व प्रकारचे शॉट खेळत आहेत.



त्याला पाहून मी उत्साहित होत आहे. मधल्या फळीत तो मोठ्या दबावाखाली चांगली फलंदाजी करत आहे. तो अनुभवी आहे.



जर त्यानं ही गती कायम ठेवली तर आरसीबीचा आयपीएलमधील प्रवास मोठा होऊ शकतो.



यंदाच्या आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. त्यानं या हंगामात 205.88 स्टाईक रेटनं 210 धावा केल्या आहेत. तो सात पैकी सहा सामन्यात नाबाद राहिला आहे.