दैनंदिन आयुष्यात आपण अनेक वस्तू वापरतो, परंतु त्याबद्दल आपल्याला फारच कमी माहिती असते. मोबाईल फोनमध्ये आवश्यक असणारं सिम कार्ड हे त्यापैकीच एक आहे. सिम कार्डशिवाय मोबाईल फोनला काही अर्थ राहत नाही. परंतु सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो, याची तुम्हाला कल्पना आहे का? सुरुवातीला सिम कार्डचा कोपरा कापलेला नसायचा, त्यामुळे युझर्सना सिम कार्ड लावण्यात अडचणी येत होत्या. लोक बरेचदा सिम कार्ड उलटसुलट लावायचे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांनी सिम कार्डचा एक कोपरा कापण्यास सुरुवात केली. जेणेकरुन सिम मोबाईल फोनमध्ये योग्य ठिकाणी लावता येईल. जर लोकांनी उलट टाकलं तर त्याची चिप खराब होण्याचा धोका देखील असतो. सब्सक्रायबर (S) आयडेंटिटी (I) मॉड्यूल (M) असा SIM चा फुल फॉर्म आहे.