व्हॉट्सॲपचं नवं फिचर! क्यूआर कोडनं करा चॅट ट्रान्सफर

व्हॉट्सॲपचं नवं फिचर! क्यूआर कोडनं करा चॅट ट्रान्सफर

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हाट्सॲपचं नवीन फिचर लाँच केलं आहे.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हाट्सॲपचं नवीन फिचर लाँच केलं आहे.

मेटाने व्हाट्सॲप चॅट दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये ट्रान्सफर करण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग शोधला आहे.

मेटाने व्हाट्सॲप चॅट दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये ट्रान्सफर करण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग शोधला आहे.

व्हॉट्सॲप चॅट्स दुसऱ्या फोनमध्ये हस्तांतरण म्हणजेच ट्रान्सफर करण्यासाठी मेटाने QR-Code बेस्ड लोकल डेटा ट्रान्सफर फीचर लाँच केलं आहे

या फीचरच्या मदतीने तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या जुन्या फोनचा चॅट हिस्ट्री तुमच्या नवीन फोनमध्ये ट्रान्सफर करू शकाल.

आता व्हॉट्सॲप युजर्स अनधिकृत ॲप्सद्वारे डेटा ट्रान्सफर करण्यापेक्षा व्हॉट्सॲपवरच अधिक सुरक्षित आणि गोपनीयता पद्धतीने व्हॉट्सॲप चॅट ट्रान्सफर करु शकता.

जुन्या डिव्‍हाइसवरून नवीन डिव्‍हाइसवर WhatsApp चॅट ट्रान्सफर करण्‍यासाठी, आधी जुन्या डिव्‍हाइसवर WhatsApp उघडा आणि सेटिंग्‍ज > चॅट > चॅट ट्रान्सफर वर जा.

यानंतर, युजर्सना चॅट ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन फोनवरून QR कोड स्कॅन करण्यास सांगितलं जाईल.

यासाठी वाय-फाय (Wi-Fi) कनेक्शन आवश्यक आहे.

या नवीन फिचरचा वापर करून तुम्ही चॅट ट्रान्सफर करण्यासाठी दोन्ही फोन चालू आहेत आणि एकाच Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट केलेले आहेत याची खात्री करून घ्या.