तुमच्या iPhone मध्ये iOS 17 अपडेट मिळेल की नाही? पाहा यादी



ॲपल कंपनीने नुकतंच iOS 17 व्हर्जन लाँच केलं आहे. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम अनेक जुन्या iPhone मध्ये चालणार नाही.



अलिकडेच ॲपलने नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 17 लाँच केली आहे. या नवीन ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अनेक आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत.



दरम्यान, ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम काही आयफोन्समध्ये चालणार नाही. या यादीत कोणते आयफोन आहेत, ते जाणून घ्या.



आयफोन 14 सीरीजमधील आयफोन्समध्ये नवीन iOS 17 अपडेट्स आणि फिचर्सचा फायदा मिळेल.



ॲपलने मागील वर्षी लॉन्च केलेल्या iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या चार मॉडेल्सना iOS 17 अपडेट मिळणार आहे.



iPhone 13 लाईनअपमधील सर्व मॉडेल्समध्ये iOS 17 अपडेट मिळेल. यामध्ये iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro, आणि iPhone 13 Pro Max यांचा समावेश आहे.



ॲपलच्या पहिल्या 5G कनेक्टिव्हिटीसह येणार्‍या सीरिजमधील चारही मॉडेल iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांमध्ये Apple चं नवं iOS 17 सॉफ्टवेअर अपडेट मिळेल.



तीन वर्षे जुन्या डिव्हाइसमध्ये आयफोन 12 सीरिजमधील आतापर्यंत कंपनीने सर्व नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स दिले आहेत.



तुमच्याकडे iPhone 11, iPhone 11 Pro किंवा iPhone 11 Pro Max असल्यास यामध्येही तुम्हाला iOS 17 सॉफ्टवेअर अपडेटचा लाभ घेता येईल.



सुमारे पाच वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या हे आयफोन आजही लाखो युजर्स वापर आहेत, यामुळे कंपनी iPhone XS/XS Max, iPhone XR या सीरीजमध्येही iOS 17 सपोर्ट दिला आहे.



पण, हार्डवेअरच्या मर्यादांमुळे iPhone XS/XS Max, iPhone XR युजर्संना सर्व नवीन फिचर्स वापरता येणार नाहीत.



गेल्या वर्षी Apple ने शक्तिशाली A15 बायोनिक प्रोसेसरसह परवडणारे iPhone SE आणले होते. iPhone SE मध्ये तुम्हाला नवं iOS 17 ऑपरेटिंग सिस्टिम वापरता येईल.



iOS 17 ऑपरेटिंग सिस्टिमसाठी A12 बायोनिक चिपची आवश्यकता आहे. त्यामुळे हे नवीन iOS अपडेट iPhone 8, iPhone 8 Plus, आणि iPhone X या आयफोनमध्ये मिळणार नाही.