बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच 'विक्रम वेधा' या चित्रपटात दिसणार आहे. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात हृतिकसोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे . अलीकडेच 'विक्रम वेधा'शी संबंधित अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या. ज्यामुळे चित्रपटाला नकारात्मक प्रसिद्धी मिळत होती. हृतिक रोशनने उत्तर प्रदेशमध्ये शूटिंग करण्यास नकार दिला होता, त्यानंतर यूपीचा सेट दुबईमध्ये बनवण्यात आला होता. चित्रपटाचे बजेट खूपच वाढले. आता या सर्व बातम्यांना पूर्णविराम देत निर्मात्यांनी एक निवेदन जारी केले आहे. रिलायन्स एंटरटेनमेंटने अलीकडेच सोशल मीडिया हँडलवर स्पष्टीकरण दिले आहे. विक्रम वेधच्या शूटिंग लोकेशन्सबाबत आम्ही अनेक दिशाभूल करणाऱ्या आणि पूर्णपणे निराधार बातम्या पाहत आहोत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की विक्रम वेधाचे लखनौसह भारतात मोठ्या प्रमाणावर शूटिंग झाले आहे, असे नविदेनात म्हटले आहे. चाहत्यांना देखील या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.