तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, डॉल्फिन मासे पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत.
डॉल्फिन मासा असूनही तो पूर्ण वेळ पाण्याखाली राहू शकत नाही.
डॉल्फिन मासा पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाही, म्हणूनच तो 2 ते 3 मिनिटांनी पाण्याच्या पृष्ठभागावर येतो आणि श्वास घेतो.
कधीकधी डॉल्फिन मासा 5 ते 7 मिनिटे श्वास रोखू शकते आणि पाण्यात राहू शकतात.
डॉल्फिन जेव्हा झोपतात तेव्हा फक्त एक डोळा बंद करतात.
जेव्हा मेंदूचा उजवा अर्धा भाग झोपतो तेव्हा डावा डोळा बंद होतो.
याउलट मेंदूचा जेव्हा मेंदूचा डावा अर्धा भाग झोपतो तेव्हा उजवा डोळा बंद होतो.
या झोपेला 'युनिहेमिस्फेरिक स्लीप' (Unihemispheric sleep) असे म्हणतात. झोपेत
असताना श्वासोच्छवास चालू ठेवण्यासाठी, अनेक जलचर सस्तन प्राणी ज्याला युनिहेमिस्फेरिक स्लीपचा वापर करतात.
युनिहेमिस्फेरिक स्लीप म्हणजेच झोपताना त्यांचा अर्धा मेंदू कार्य करतो.
युनिहेमिस्फेरिक स्लीपमध्ये मेंदूचा फक्त अर्धा भाग एका वेळी विश्रांती घेतो.
त्यावेळी दुसरा अर्धा भाग काम करतो म्हणून डॉल्फिन एक डोळा उघडे ठेवून झोपतात.