वीट भाजताना त्यात असलेल्या घटकांमध्ये काही रासायनिक क्रिया घडतात, ज्यामुळे त्याचा रंग लाल होतो. याबाबत अधिक जाणून घ्या.



घर बांधण्यासाठी सिमेंट, लाकूड, लोखंड, वीट इत्यादी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीट.



मोठमोठ्या इमारती असो किंवा घर ते बनवण्यासाठी विटांचा वापर केला जातो. वीट लाल रंगाची असते, हे तुम्ही पाहिले असेलच.



पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, विटेचा रंग फक्त लालच का असतो? काळा, निळा, पिवळा किंवा हिरवा अशा इतर कोणत्याही रंगाच्या विटा का नसतात? विटांच्या रंगामागील कारण जाणून घेऊया.



विटा तयार करण्यासाठी गुळगुळीत पिवळी माती वापरली जाते. विटा बनवण्याच्या मातीमध्ये 50 ते 70 टक्के वाळू असते.



याशिवाय त्यामध्ये 20 ते 30 टक्के ॲल्युमिना, 2 ते 5 टक्के चुना, 1 टक्के मॅग्नेशियम आणि 7 टक्के लोह असते. ही माती विटा बनवण्यासाठी साच्यात टाकून त्याला विटेचा आकार दिला जातो.



काही दिवस उन्हात वाळवल्यानंतर, विटा अधिक मजबूत करण्यासाठी भट्टीमध्ये उच्च तापमानात (सुमारे 875 ते 900 डिग्री सेल्सिअस) बेक केल्या जातात म्हणजे भाजल्या जातात.



लोह आणि इतर धातूंमध्ये इतक्या उच्च तापमानावर प्रतिक्रिया होते. लोह आणि इतर धातूंचे ऑक्साइड ॲल्युमिना सिलिकासोबत मिळून लोह ऑक्साईड तयार होतो.



या लोह ऑक्साईडमुळे विटांना लाल रंग येतो. याच कारणामुळे विटांचा रंग लाल असतो.