विमानातून प्रवास करणे फारच रोमांचक असते.
इतर सर्व वाहनांच्या खिडक्या चौकोनी किंवा आयताकृती असतात. विमानातील खिडकी साधारणपणे अंडाकृती आकाराची असते.
विमानाच्या खिडक्या पूर्णपणे गोलाकार नसतात, परंतु साधारणपणे विमानाच्या खिडक्या अंडाकृती आकारात असतात
विमानाच्या खिडकीला टोक नसतात.
यामागचे कारण म्हणजे चौकोनी आकाराची खिडकी वाऱ्याचा दाब सहन करत नाही आणि पटकन तडकते.
याउलट गोल आकाराची खिडकी वाऱ्याचा दाब सहन करते आणि खिडकी वक्र असल्यामुळे काचेला तडा जात नाही.
जेव्हा विमान आकाशात असते तेव्हा विमानाच्या आतील आणि बाहेरील असा हवेचा दाब दोन्ही बाजूंनी असतो.
हा दाब सतत बदलत राहतो, म्हणूनच विमानाला गोल खिडक्या असतात.
गोल खिडक्या असल्यामुळे विमान जास्त उंचावर असताना हवेच्या दाबामुळे खिडकीची काच फुटण्याचाधोका अधिक असतो.
चौकोनी खिडकीमध्ये टोकांवर दाब वाढतो आणि खिडकीची काच तडकते
पण गोलाकार खिडकीच्या बाबतील हा दाब समांतर वाटला जातो आणि खिडकीची काच तडकत नाही.