हिवाळ्याला सुरुवात झाली आहे.

पण काही जागेवर डास हे मोठ्या प्रमाण वाढले आहेत.

सर्वांनाच माहितीये की, डास चावल्यावर खाज येते.

डास हा रक्त पिण्यासाठी आपल्या शरिरात सुई सारख्या बारीक सोंडेने होल पडतो.

जेव्हा डास चावतो तेव्हा तो तुमच्या त्वचेमध्ये लाळ टाकतो.

मानवी शरीर लाळेवर प्रतिक्रिया देते.

त्यामुळे चावलेल्या जागेवर गाठ होते आणि खाज येते.

काही लोकांना डास चावल्यावर खूप कमी खाज येते.

काही लोकांवर याचा जास्त असर होतो.

तसेच काहींना चावलेल्या जागेवर सूज, वेदना आणि लाला चट्टे येतात.