हल्ली जीन्सचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. मुलं आणि मुली दोघेही जीन्सचा वापर करतात. जीन्स ही डेनिमच्या कपड्यापासून तयार केली जाते. डेनिमचा कपडा हा पूर्णपणे कॉटनचा असतो. तसेच जीन्सची शिलाई ही चांगल्या मशिनमुळे खूप चांगल्या प्रकारे केली जाते. तसेच यासाठी वापरला जाणारा कपडा देखील उत्तम दर्जाचा असतो. त्यामुळे जीन्स जास्त काळ टिकते त्यामुळे जीन्स लवकर खराब देखील होत नाही. म्हणून जीन्सला सारख सारखं धुण्याची गरज देखील नसते.