अनेक लोक आता हायब्रिड गाड्या खरेदी करण्यावर भर देत आहे नाही तर थेट CNG गाड्या घेण्यावर भर देताना दिसत आहे.

तर आज आम्ही तुम्हाला अशाच 5 आलिशान सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा CNG

मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीमध्ये 1462 CCचे इंजिन देण्यात आले आहे.
25.51 किमी प्रति किलो मायलेज मिळण्याचा दावा करण्यात आला आहे.

मारुती फ्रॉन्क्स सिग्मा CNG

मारुती फ्रॉन्क्स सिग्मा सीएनजीमध्ये 1197 सीसीचे इंजिन देण्यात आले असून ते 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
ही कार 28.51 किमी प्रति किलोचे सर्टिफाइड मायलेजसह येते.

मारुती सुझुकी डिझायर CNG

मारुती सुझुकी डिझायर व्हीएक्सआय सीएनजीमध्ये 1197 सीसी इंजिन आहे जे केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
या कारचे मायलेज 31.12 किलोमीटर आहे.

टाटा टियागो एक्सजेड प्लस CNG

टाटा टियागो एक्सझेड प्लस सीएनजीमध्ये 1199 सीसी इंजिन आहे जे केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
हे इंजिन 26.49 किमी प्रति किलोमीटर मायलेज देते.