हिंदू धर्मातील लोक पूजाअर्चा आणि देव दर्शनासाठी मंदिरात जातात. लोकांच्या हातून मंदिरात गेल्यावर काही चुका होतात. यामुळे मंदिरात गेल्याचे पूर्ण फळ मिळत नाही. असे म्हटले जाते. जाणून घ्या मंदिरात गेल्यावर कोणत्या गाष्टींकडे लक्ष द्यायला हवे. मंदिराला प्रदक्षिणा मारताना नेहेमी उजव्या हाताकडून सुरुवात करावी. चुकीच्या दिशेने प्रदक्षिणा मारणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की मंदिरात देवाच्या मूर्तीच्या अगदी समोर उभे राहून पूजा करू नये. मंदिरात मोठ्याने हसून आणि जोर जोरात बोलून तेथील शांतता भंग करू नये. मंदिरात जर एखादी व्यक्ती देवाचे दर्शन घेत असेल तर त्याच्या समोरून जाऊ नये. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.