देशात अशा ही काही नद्या वाहतात, ज्या काही कारणास्तव शापित असल्याचे सांगितले जाते. नद्यांचा देखील काही इतिहास आणि महत्व आहे. बिहार मध्ये एक अशी नदी वाहते जी शापित असल्याची मान्यता आहे. असे म्हटले जाते की, या नदीला देवी सीता मातेने शाप दिला होता. या नदीचे नाव फल्गु नदी आहे. ही नदी गया येथून वाहते. असे सांगितले जाते की, देवी सीता आणि प्रभू श्रीरामा हे, लक्ष्मणा सोबत दशरथ चे श्राद्ध करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले होते. लक्ष्मण आणि प्रभू श्रीराम सामान आणण्यासाठी तेथून निघून गेले. देवी सीतेने फल्गु नदी, गाय, तुळशी, अक्षय वट आणि ब्राम्हण यांना साक्षी मानून श्राद्ध केले. जेव्हा प्रभू श्रीराम यांनी या विषयी विचारले तेव्हा फल्गु नदी खोट बोलली असे सांगितले जाते. याच रागाच्या भरात देवी सीतेने नदीला शाप दिला. अशी मान्यता आहे.