हिवाळ्यात फक्त सर्दी-खोकलाच नाही तर अनेक आजार उद्भवतात. अशा वेळी आलं फायदेशीर आहे.
सोडियम, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सी, फोलेट, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखे गुणधर्म आल्यात आढळतात.
हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
आलं हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते.
हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
हिवाळ्यात गरम चहामध्ये आल्याचा तुकडा टाकून तो पिणे फायदेशीर मानले जाते.
जेवणानंतर एक तासाने याचे सेवन करा. असे केल्याने फॅटी लिव्हरची समस्याही दूर होऊ शकते.
थंडीत आहारात बदल होतो, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन अशा समस्यांनी लोक हैराण झाल्याचे पाहायला मिळते. अशा वेळी आल्याचे सेवन केल्यास आराम मिळतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.