उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोक आईस्क्रीम खाण्याला जास्त पसंती देतात. परंतु हल्ली लोकं हिवाळ्यात देखील आईस्क्रीम खातात. प्रत्येक ठिकाणी अगदी लग्न समारंभामध्येही लोकं आईस्क्रीम खाताना दिसतात. पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का? की आईस्क्रीमची कांडी ही लाकडाचीच का असते? आईस्क्रीमच्या कांडीसाठी लाकडाचा उपयोग केला जातो. कारण आईस्क्रीमध्ये बर्फाचा वापर केला जातो. त्यामुळे ज्या लाकडामध्ये स्टार्च असतं त्या लाकडाचा वापर आईस्क्रीमच्या कांडीमध्ये केला जातो. ते बर्फासोबत हायड्रोजन देखील स्थिर ठेवते. त्यामुळे लाकडाचा उपयोग आईस्क्रीमच्या कांडीमध्ये केला जातो.