शरीरासाठी कारलं अत्यंत फायदेशीर असतं. पंरतु तरीही बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे कारल्याचं कडवटपणा. कारलं हे पहिल्यांदा आफ्रिकेमध्ये आढळून आलं होतं. हे आफ्रिकेमधील शिकाऱ्यांचं जेवण आहे. त्यानंतर कारलं हे आशियामध्ये आढळून आलं. कारल्यामध्ये नॉन - टॉक्सिक ग्लाइकोसाईड मोमोर्डिसिन असतं. त्यामुळे कारलं हे कडू असतं. पण कारलं हे शरीरासाठी अनेक पोषण तत्त्वे देण्यास मदत करतं. मधूमेहासाठी देखील करलं अत्यंत फायदेशीर असतं.