राम मंदिर प्राण प्रतिष्ठापने निमित्ताने शंकराचार्य चर्चेत आले आहेत.



सनातन धर्मानुसार हा कार्यक्रम होत नसल्या कारणाने आम्ही कार्यक्रमात सहभागी होणार नाही असं त्यांनी म्हटलय.



'शंकराचार्य' हे हिंदू धर्मातील सर्वोच्च पद आहे,जसे की बौद्ध धर्मात 'दलाईलामा', ईसाई धर्मात 'पोप'.



भारतात चार मठांत चार शंकराचार्य असतात.



आदि शंकराचार्य यांनी हिंदू धर्माच्या प्रतिष्ठेसाठी भारताच्या चार भागात चार पीठं/मठ स्थापन केले.



ते चार मठ म्हणजे द्वारका मठ, जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ



या मठांत आदि शंकराचार्यांनी आपले चार प्रमुख शिष्यांना शंकराचार्य पदावर बसवले.



तेव्हापासून या चार मठांत शंकराचार्य पदाची परंपरा चालत आली आहे.



आद्य शंकराचार्य हे इ.स. ७०० व्या शतकात होऊन गेले आहेत.