भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या व्हिडीओतील तरुणी कोण आहे जाणून घ्या.



भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ आणि एका तरुणीमध्ये वाद सुरु असल्याचं दिसून येत होतं.



व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉसोबत व्हायरल घालणारी ही तरुणी अभिनेत्री सपना गिल आहे. या व्हिडीओमध्ये पृथ्वी आणि एका तरुणीमध्ये बाचाबाची सुरु असल्याचं स्पष्ट दिसत होतं.



पृथ्वीच्या मित्राने या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं.



दरम्यान या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल आणि आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली.



पृथ्वी शॉसोबत व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे.



सपना गिल तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे.



सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



सपनाला अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.



सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला.



भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा एका तरुणीसोबत वाद झाला. मुंबईतील हॉटेल बाहेर ही घटना घडली.



सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं. पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचं यात सांगण्यात येत आहे.



या प्रकरणावरुन पृथ्वीच्या मित्रांनी ओशिवरा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरुन संबंधित तरुणी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.



त्यानंतर तरुणी सपना गिलसह इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती, त्यांनंतर सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासामध्ये खरं काय ते समोर येईल.