इजिप्तमधील पिरॅमिड आणि त्यातील ममी यांच्याबाबत संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत असते.

आता पुरातत्व शास्त्रज्ञांना एका 2300 वर्ष जुन्या ममीमध्ये खजिना सापडला आहे.

इजिप्तमधील एका ममीमध्ये सोन्याचं ह्रदय, सोन्याची जीभ असल्याचं समोर आलं आहे.

इतकंच नाही तर या ममीमध्ये 49 सोन्याचे तावीजही सापडले आहेत. यामुळे शास्त्रज्ञांसह सर्वांमध्ये हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.

ही ममी 1916 मध्ये ही ममी सापडली होती, मात्र आजपर्यंत तिचा अभ्यास झालेला नाही.

कैरो येथील इजिप्शियन म्युझियमच्या स्टोअर रूममध्ये ही ममी 100 वर्षांहून अधिक काळ अशीच पडून होती.

आता कैरो युनिव्हर्सिटीच्या डॉ. सहार सलीम यांच्या टीमने या ममीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तेव्हा समोर आलेल्या या बाबींमुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

संशोधकांचा दावा आहे की, ही ममी एका किशोरवयीन मुलाची आहे. मृत्यूच्या वेळी त्याचे वय 14 ते 15 वर्षांच्या दरम्यान असेल.

शास्त्रज्ञांच्या टीमने सीटी स्कॅनरच्या मदतीने या ममीचा अभ्यास केला आहे. सीटी स्कॅनरच्या मदतीने काढण्यात आलेल्या ममीच्या फोटोंमध्ये नवीन माहिती समोर आली आहे.

या फोटोमध्ये दिसून आलं की, या किशोरवयीन मुलाच्या ममीमध्ये सोन्याचं ह्रदय, सोन्याची जीभ आहे.