प्रेम म्हटलं की लाल रंगाचा उल्लेख होतो. प्रेमी युगुलांसाठी हा रंग खास मानला जातो.



जोडीदाराला प्रेमाने कोणतीही भेटवस्तू द्यायची म्हटली तर त्यासाठी प्रत्येक जण लाल रंगाला प्राधान्य देतात.



लाल रंगाचं गुलाब, लाल फुलं असो किंवा इतर कोणत्याही लाल रंगाच्या वस्तूची निवड केली जाते.



प्रेम म्हटलं की सर्वांच्या डोळ्या समोर फक्त लाल रंग येतो. लाल रंगाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. पण प्रेमाचा रंग 'लाल'च का असतो? यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का, नसेल तर जाणून घ्या.



प्रेम आणि लाल रंगाचा संबंध फार पूर्वीपासून आहे. प्रेम आणि लाल रंगाचं नातं इतिहास काळापासून प्रचलित आहे.



रिपोर्टनुसार, 13 व्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच कवितेमध्ये याचा उल्लेख आहे. या कवितेमध्ये कवी एका बागेत लाल रंगाचं फूल शोधतं आहे, असं वर्णन आहे.



या कवितेतील लाल फूल म्हणजे त्याचा जोडीदार आणि प्रेम असा अर्थ लावला जातो. त्यामुळे कवी त्याच्या आयुष्यातील प्रेम आणि प्रिय व्यक्तीची वाट पाहत आहे, असं मानलं जातं.



लाल रंग जीवनाचं प्रतीक आहे. आपल्या रक्ताचा रंग लाल आहे. त्यामुळे लाल रंगाचा संबंध जीवनाशी असल्याचं म्हटलं जातं.



लाल रंग म्हणजे जणू तुमचं अस्तित्व असाही त्याचा अर्थ लावला जातो. आणखी एक कारण म्हणजे लाल रंग हा धर्माशी संबंधित आहे.



लाल रंग धार्मिक कार्यांसाठी शुभ मानला जातो. हिंदू धर्मात कोणतंही धार्मिक कार्य, पूजा किंवा विवाह यासाठी लाल रंग महत्त्वाचा मानला जातो.