प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे चांगलाच चर्चेत असतो. अरमान मलिकच्या दोन बायका असून त्या दोघीही गरोदर आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. अलिकडेच अरमान मलिकच्या दोन्ही प्रेग्नेंट बायकांच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला. पण याआधी काही कारणावरून अरमान मलिकला राग आणि त्याने दोन्ही पत्नींच्या कानाखाली लगावली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अरमानच्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल यांच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघीही ट्विनिंग ड्रेसमध्ये दिसल्या. कृतिका आणि पायल दोघींचे अगदी कपड्यांपासून ते ज्वेलरी आणि कानातले अगदी सेम-टू-सेम होते. इतकंच नाहीतर दोघींची हेअरस्टाईलची सेम होती. याचं कारणावरून सवतींमध्ये भांडण लागलं. यावेळी अरमान मलिकला राग अनावर झाला आणि त्याने दोन्ही बायकांच्या कानाखाली मारली. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ खरा नसून एक प्रँक व्हिडीओ (Prank Video) आहे. अरमान आणि त्याच्या बायकांनी मिळून मनोरंजनासाठी हा व्हिडीओ तयार केला आहे.