पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते, हे सर्वांनाच माहिती आहे. यामुळे संपूर्ण जगात दिवस आणि रात्रीची वेळ वेगवेगळी असते.



जगभरात सर्व ठिकाणी सुर्योदय आणि सुर्यास्ताची वेळ वेगवेगळी असते.



भारतात पहाटे 6 वाजलेले असतात, तेव्हा अमेरिकेमध्ये रात्र असते. पण जगात असाही एक देश आहे, जिथे फक्त 40 मिनिटांची रात्र आहे.



या देशात सूर्य फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो आणि त्यानंतर लगेचच पहाट होते आणि दुसरा दिवस उजाडतो. येथे रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास सुर्योदय होतो.



नॉर्वेमध्ये फक्त 40 मिनिटांसाठी सूर्य मावळतो आणि मध्यरात्री सूर्य उगवतो. म्हणूनच या देशाला 'कंट्री ऑफ मिडनाइट सन' असंही म्हणतात.



नॉर्वे हा जगाच्या नकाशावर युरोप खंडाच्या उत्तरेस वसलेला देश आहे.



हा देश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे जगातील अनेक भागांच्या तुलनेत येथे अतिशय थंड हवामान आहे.



नॉर्वे आर्क्टिक ध्रुवीय प्रदेश आहे, त्यामुळे येथे एक विचित्र घटना घडते.



नॉर्वेमध्ये मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत सुमारे 76 दिवस म्हणजेच अडीच महिने सूर्य फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो.



पण, ही परिस्थिती वर्षभर नसते. हे फक्त अडीच महिन्याच्या काळात होते. अडीच महिने नॉर्वेमध्ये रात्र फक्त 40 मिनिटांची असते.



येथे रात्री ठीक 12:43 वाजता सूर्य मावळतो आणि त्यानंतर फक्त 40 मिनिटांनी म्हणजे रात्री 1:30 च्या सुमारास उगवतो.