फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या सौदी अरेबियाच्या अल् नासर क्लबकडून खेळत आहे. फुटबॉल इतिहासीतील सर्वात मोठी डिल करुन रोनाल्डो या क्लबमध्ये गेला. तब्बल 200 मिलीयन युरोजमध्ये ही डिल झाली. नव्या क्लबमध्ये तो नव्या सहकाऱ्यांसोबत मैदानात उतरला असून काही दिवसांपूर्वी मेस्सीच्या पीएसजी संघासोबत सामना खेळला. सामन्यात रोनाल्डोने दमदार कामगिरी केली होती. रोनाल्डोने 2 गोल करत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती, पण पीएसजीने सामना 5-4 ने जिंकला होता. दरम्यान आता रोनाल्डोने काही फोटो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले त्यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. विशेष म्हणजे फोटोंमध्ये रोनाल्डो अगदी फिट दिसत आहे. तो तितक्याच मेहनतीने व्यायाम करत आहे.