भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती निवृत्ती त्यानंतर आज ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये ती पराभूत झाली. सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडीचा 6-7 (2), 2-6 असा पराभव झाला. कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळल्यावर सानिया भावूक झाली तिला अश्रू अनावर झाले होते. सानिया मिर्झाच्या व्यावसायिक कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. अलीकडेच तिने एका भावूक सोशल मीडिया पोस्टमधून निवृत्ती जाहीर केली होती. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन तिची अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. ज्यात तिने फायनलपर्यंत धडक घेतली, पण अखेरच्या सामन्यात पराभव झाल्यानं अखेरच्या स्पर्धेत ग्रँडस्लॅम जिंकण्याचं तिचं स्वप्न अधुरं राहिलं. दरम्यान 36 वर्षीय सानियाने टेनिस कोर्टवर बरेच पुरस्कार मिळवले.