न्यूझीलंडचा रचिन रवींद्र यानं विश्वचषकाच्या सलामीच्याच सामन्यात खणखणीत नाबाद शतक ठोकले.



सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा नऊ विकेट्स आणि 82 चेंडू राखून धुव्वा उडवला.



न्यूझीलंडनं या विजयासह गत विश्वचषकाच्या फायनलमधल्या तांत्रिक पराभवाचा वचपा काढला.



रवींद्रनं 11 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 123 धावांची खेळी उभारली.



रचित रवींद्र याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.



रचित रवींद्र याचे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्यापासून प्रेरणा घेत ठेवलेय.



रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या महान भारतीय जोडीचे मोठे चाहते आहेत



त्यांनी आपल्या मुलाचे नाव रचिन ठेवले. (राहुल द्रविडकडून 'रा' आणि सचिन तेंडुलकरकडून 'चिन' घेऊन)



रचिन रवींद्रचा जन्म वेलिंग्टनमध्ये भारतीय कुटुंबात जन्म झाला.



रचिन रवींद्र हा डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. तसेच तो फिरकी गोलंदाजीही करतो.