मोहम्मद सिराज आशिया कपच्या फायनल्समध्ये श्रीलंकेवर तुटून पडलेला एका ओव्हरमध्ये सिराजनं 4 विकेट्स घेत कारनामाच केलेला तेव्हापासून क्रिडाविश्वात टीम इंडियाच्या सिराजचाच बोलबाला आहे फलंदाजांवर वादळासारखा तुटून पडणारा सिराज तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलाय पाकिस्तानची अँकर जैनब अब्बासही सिराजची फॅन झालीये स्पोर्ट्स अँकर जैनब अब्बासनं सिराजवर कौतुकाचा वर्षाव केलाय जैनब अब्बास पाकिस्तानची टेलिव्हिजन होस्ट अन् स्पोर्ट्स अँकर आहे. पाकिस्तानात जैनबचे खूप फॅन्स आहेत. जैनबनं सिराजला लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात गोलंदाजी करताना सिराजला पाहिलेलं तेव्हापासूनच जैनब सिराजची फॅन झालेली, असं ती सांगते लॉर्ड्स टेस्टमध्ये मोहम्मद सिराजनं 8 विकेट्स घेतलेले आता विश्वचषकात सिराज काय कारनामा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय