आशिया चषकाच्या फायनल सामन्यात मोहम्मद सिराज याने आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. सिराजच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.. एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. मोहम्मद सिराज याने श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडलेय. सिराज आणि बुमराह यांच्या माऱ्यापुढे श्रीलंका संघाचा अवस्था दारुण झाली आहे. सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. मोहम्मद सिराज याने एकापाठोपाठ एक विकेट घेत आशिया चषकाच्या फायनल सामन्यात दमदार कामगिरी केली. सिराजच्या माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाज फेल ठरले. टीम इंडियाने श्रीलंकेला 50 रन्सवर ऑल आऊट केले.