टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आपला साधेपणा, संयमी स्वभाव अन् शानदार खेळी यामुळे धोनी नेहमीच चर्चेत असतो. चाहत्यांची आन बान शान असलेला धोनी सध्या त्याच्या लूकमुळे चर्चेत आहे. तसा धोनी आपल्या फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो सध्या धोनी त्याच्या नव्या हेयर स्टाईलमुळे चर्चेत आहे आपल्या आगळ्या वेगळ्या हेअर स्टाईल्सनं धोनी नेहमीच चाहत्यांना सरप्राईज देत असतो आगामी विश्वचषकापूर्वी धोनीची नवी हेयर स्टाईल व्हायरल होतेय धोनीची हेयरस्टाईल चाहत्यांना 2007 टी20 विश्वचषकाची आठवण करुन देतेय धोनीचा हेयर स्टायलिश आलिम हाकिमनं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन काही फोटो शेअर केलेत माहीच्या लॉन्ग हेयर लूकचा मी नेहमीच फॅन होतो, असंही आलिम हकीम सांगतो मी नशीबवान आहे की, मला माहीचा लूक करण्याची संधी मिळाली, असंही हकीम म्हणतो. टीम इंडियात पदार्पण केल्यापासून धोनी लॉन्ग हेयर लूकमध्येच दिसलेला मात्र, 2011 चा विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीनं हेयर स्टाईल चेंज केलेली पण, चाहत्यांना आता त्यांचा लाडका माही त्याच जुन्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.