भाऊबीजेच्या दिवशी भावाच्या कपाळावर कोणता टिळा लावाल? भाऊबीज हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा दिवस आहे. भाऊबीज हिंदू धर्मातील पवित्र सण आहे. हा दिवस बहिण-भावाचे प्रेमाचं प्रतिक असल्याचं मानलं जातं. या दिवशी बहिण भावाला ओवाळणी करते आणि त्याच्या कपाळावर टिळा लावतो. यावेळी बहिण भागाचं उत्तम आरोग्य आणि दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊबीजेच्या दिवशी भावाच्या कपाळावर कोणता टिळा लावावा, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? या दिवशी चंदन टिळा लावणं, शुभ मानलं जातं. भाऊबीजेच्या दिवशी भावाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावून त्यावर अक्षता लावा. हा टिळा लावून बहिण प्रार्थना करते की, यम त्याच्यापासून दूर राहावा आणि त्याला दिर्घायुष्य लाभावं. यमराजाने यमुना मातेला तथास्तू बोलत हे वरदान दिलं होतं. कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षाच्या द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्याची परंपरा आहे. भाऊबीजेच्या दिवशी भावाला चंदन टिळा लावावा. चंदन टिळा लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि अन्न-धान्याची कमतरता भासत नाही.