हिंदू धर्मातील दिवाळीचा सण हा सर्वात मोठा आणि महत्वाचा मानला जातो. दिवाळीच्या या शुभ पर्वाची सुरुवात ही वसुबारस सणापासून होते. आज वसुबारस आहे. आजपासून दिवाळीच्या प्रकाश पर्वाला सुरुवात झाली आहे. वसुबारस म्हणजे गाय गोठ्याची पूजन करून केली जाते. गाईच्या पोटात तेहतिस कोटी देव असल्याची श्रद्धा हिंदू धर्मामध्ये असल्याने कोणत्याही शुभ कार्य प्रसंगी गाईचं पूजन केलं जातं. आज वसुबारस निमित्ताने ग्रामीण भागात घरोघरी गाईचे पूजन केले जातं. गाय आणि वासराचे पूजन केल्याने परिवारात सुख, शांती, समृद्धी नांदते, अशी अनेकांची श्रद्धा आहे.