दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबरला आहे खऱ्या अर्थात दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं या दिवशी घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते झाडूची पूजा केल्याने घरात सकारात्मकता पसरते घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात झाडूचा वापर केला जातो यामुळे दिवाळीला झाडूची पूजा करतात