सोनं ही अशी गोष्ट आहे ज्यात जगभरातील लोकं गुंतवणूक करतात. बरेच लोकं सुंदर दिसण्यासाठी सोनं खरेदी करतात तर काही त्यातून चांगला परतावा मिळावा या साठी. जगातील काही देशात सोन्याचे भाव खूप कमी आहेत. बाकी देशांच्या तुलनेत चीन मध्ये सोनं स्वस्त मिळते. हॉंगकॉंग मध्ये सोन्याची किंमत जास्त आहे, इथे 41 हजारात 10 ग्रॅम सोनं मिळते. अमेरिकेत देखील स्वस्त दरात सोनं खरेदी केल जाऊ शकतं. सौदी अरेबियात भारताच्या तुलनेत कमी किंमतीत सोनं मिळते. सिंगापूर मध्ये देखील कमी किमतीत सोनं मिळते पण इथे सावधानी बाळगली पाहिजे.