बाजारात आपण वेगवेगळ्या प्रकारची बटाटे पाहतो. पण आज आपण जगातील सर्वात महाग बटाट्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. हे बटाटे प्रति किलो 90 हजार रुपये किंमतीनं विकले जातात. म्हणजे सोने आणि चांदीपेक्षाही महाग दराने हे बटाटे विकले जातात ले बोनोटे'असं या बटाट्याच्या जातीचं नाव आहे, जे फ्रान्समध्ये घेतले जाते. दरम्यान, या बटाट्याचे उत्पादन कमी आहे.वर्षभरातील मे ते जून या कालावधीतच या बटाट्याचे उत्पादन केले जाते. हे बटाटे 50,000 ते 90,000 रुपये प्रति किलो या दराने विकले जाते. ला बोनेटच्या चवीबद्दल बोलायचे झाले तर त्यात मीठ आणि अक्रोडांसह लिंबाची चव आहे. जी इतर कोणत्याही बटाट्यामध्ये आढळत नाही. ते खूप मऊ आणि नाजूक असतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.