ओपेक [ OPEC] ही पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे



OPEC चे पूर्ण रूप Organization of the Petroleum Exporting Countries असं आहे



अल्जीरिया, इराक, इराण, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ऍंगोला आणि व्हेनेझुएला सारखे देश ओपेक चे सदस्य आहेत.



ओपेक ची स्थापना १० सप्टेबर १९६० ला झाली.



त्याचे मुख्यालय ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हियेना येथे आहे.



तेल उत्पादन करणाऱ्या देशांचा वैयक्तिक फायदा जपणे हे या संघटनेचे ध्येय आहे.



आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रुड तेलाची किंमत नियंत्रित ठेवणे हे काम ओपेक सांभळते.



तसेच किंमतीमध्ये अनावश्यक व हानिकारक बदल होऊ न देणे हे काम देखील ओपेक सांभळते.



ओपेक च्या सदस्य देशांकडुन होणारे तेल उत्पादन हे एकूण तेल उत्पन्नाच्या ४० % आहे .



व्हेनेझुएला चे अर्थतज्ञ डॉ जॉन अल्फान्सो यांच्या कल्पनेतुन ही संघटना निर्माण झाली.