भारतात नद्यांना पवित्र स्थान आहे. यामध्ये सर्वात खास आहे ती गंगा नदी. गंगेला नेहमी गंगा माँ म्हणून संबोधले जाते. पण या गंगेचं सासर कुठे आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. महाभारताच्या कथेनुसार, गंगेचा विवाह महराजा शांतनुसोबत झाला होता. त्यांच राज्य हे उत्तर प्रदेशातील पश्चिम भागात होतं. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागाला गंगेच सासर म्हणून संबोधतात. गंगा नदीचा उगम हा भगीरथी आणि अलकनंदा नदीपासून होतो. ही भारतातील तिसरी सर्वात मोठी नदी आहे.