वेळेबरोबरच विज्ञान देखील खूप प्रगती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण आजही बऱ्याच जणांची मान्यत आहे की, पृथ्वी ही गोल नाही तर सपाट आहे. तसेच काही लोकांना वाटतं की पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर उभी आहे. पण तुम्हाला माहित आहे की, पृथ्वी कशावर उभी आहे ते? विज्ञानानुसार, पृथ्वीच्या दोन पिंडादरम्यान एक आकर्षक बल कार्य करते. या बलाला गुरुत्वाकर्षण असं म्हटलं जातं. ज्या गोष्टीचं जितकं जास्त वजन असतं तितकाच प्रभाव त्यावर गुरुत्वाकर्षण शक्तीचा असतो. आता सौरमालेत सूर्य हा सर्वात मोठा आणि वजनदार आहे. सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वी सुर्याभोवती फिरत असते. त्यामुळेच पृथ्वी तिच्या कक्षेत स्थिर आहे.