'सीमा हैदर,सचिन' फिल्मी जोडीचा करवा चौथ! पाकिस्तानची सीमा हैदर आणि भारतामधील सचिन या जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमित जानी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, कराची टू नोएडा या बहुप्रतिक्षित अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटाचा अधिकृत टीझर सादर करत आहोत. ‘कराची टू नोएडा’ हा चित्रपट 2024 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात दीप राज राणा, एहसान खान, रोहित चौधरी, मनोज बक्षी, फरहीन फलक आणि आदित्य राघव या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. दिल्लीत (Delhi) या सिनेमाचं शूटिंग होणार असल्याचं समोर आलं आहे. नरेला कुंडली, पानीपत आणि दिल्लीतील नोएडा या परिसरात या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 'कराची टू नोएडा' या सिनेमातील तब्बल 30 सीन्सचं शूटिंग दिल्लीत होणार आहे. 'कराची टू नोएडा' या सिनेमात सीमा हैदरच्या भूमिकेत फरहीन खान आणि सचिनच्या भूमिकेत आदित्य राघव झळकणार आहेत.