दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे.



ज्यामुळे फेज्ड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) चा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे.



अनेक भागात हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (AQI) 400 चा टप्पा ओलांडला आहे.



वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 402 होता.



त्याचवेळी दिल्लीत दिवसा अशी परिस्थिती होती की धुक्यामुळे सूर्य लपला होता.



दरम्यान याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील शाळा या पुढील दोन दिवस बंद राहणार आहेत.



प्रतिकूल हवामान आणि शेतात आग लावणे हे दिल्लीतील प्रदूषण वाढण्याचे कारण मानले जात आहे.



लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.



त्याचवेळी शास्त्रज्ञांनी येत्या दोन आठवड्यांत दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी वाढण्याचा इशारा दिला आहे.



सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्‍टोबर 2023 मधील दिल्लीतील हवेची गुणवत्ता 2020 नंतर सर्वात वाईट होती.