सफरचंदामध्ये विटॅमिन, एंटीऑक्सिडेंट, फायबरचे मुबलक प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते. परंतु तुम्हाला माहित आहे का सफरचंद कोणत्या वेळी खाऊ नये. सफरचंदामध्ये साखर आणि फ्रुक्टोज असते. त्यामुळे शरीर सक्रिय ठेवण्यास आणि झोपमध्ये व्यत्यय आणते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सफरचंद खाऊ नये. तसेच जेवणाच्या वेळी देखील सफरचंद खाऊ नये. सफरचंदामध्ये असलेल्या फायबरमुळे अन्न पचण्यास त्रास होऊ शकतो. जेवल्यानंतर किमान एक तासानंतर सफरचंद खावे. तसेच संध्याकाळच्या वेळेस जर सफरचंद खाल्ले तर पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते.