हिंदू धर्मात तुळशीला पवित्र स्थान आहे. तुळशीला देवतेसमान मानले जाते. अनेक घरात दररोज सकाळी तुळशीची पूजा देखील केली जाते. या वर्षी तुळशी विवाह कधी आहे तुम्हला माहितीये का? जाणून घ्या कधी आहे तुलसी विवाह आणि कशी करावी तुळसीची पूजा. जाणून घ्या तुळशी आणि भगवान शालिग्रामच्या विवाहाची नेमकी तारीख. दरवर्षी तुळशी विवाह देवूठाणी एकादशीच्या दिवशी केला जात असला तरी यंदा तुळसी विवाह २४ नोव्हेंबरला होणार आहे. तुळशी विवाह भगवान विष्णू किंवा त्याचा अवतार कृष्ण यांच्याशी केलेला विवाह असल्याचे सांगितले जाते. या वर्षी द्वादशी तिथी 24 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल आणि 24 नोव्हेंबर रोजी रात्री 7.06 वाजता समाप्त होईल. तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त 24 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1.54 मी. नंतर आहे.