वाढदिवस आणि लग्न सोहळे यात केक कापणे ही एक प्रथा झाली आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जवळपास सर्वांनाच केक आवडतो. आजकाल विविधी प्रकारचे केक हे बेकरीत उपलब्ध असतात. पण, तुम्हला माहितीये का केक बनवण्याचा विचार सर्वात आधी कोणाला आला. असे सांगण्यात येते की, केक बनवण्याचा विचार सर्वात आधी मिस्र येथील लोकांना आला. सुरुवातीला केक ब्रेड आणि मधाचा वापर करून तयार केला जायचा. हा केक गोल आकारात बनवला जायचा आणि याला दगडांवर भाजले जायचे. नंतर केक मध्ये यीस्ट टाकण्यास रोमन लोकांनी सुरुवात केली. वाढदिवसाला केक कपाण्याची प्रथा जर्मनीत सुरु झाली. आपण जो केक खातो तो तीनशे वर्षांपूर्वी बनवण्यास सुरवात झाली होती.