फरसबीमध्ये भरपूर फायबर असते, ते खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते.
फरसबीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते.
फरसबी खाल्ल्याने शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते.
फरसबीमध्ये कॅल्शियम आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात.
व्हिटॅमिन-K फरसबीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते, जे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते.
फरसबी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
कॅरोटीनॉईड्सने भरपूर फरसबी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
जर तुम्हाला तुमचे डोळे निरोगी ठेवायचे असतील तर तुमची हिरवी फरसबी नक्की खा. त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनमध्ये समृद्ध असतात, ज्यामुळे दृष्टी सुधारते.
फरसबीमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात. जे केस निरोगी राखण्यासाठी,नखांना मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.