हार्मोनल असंतुलन, जीवनसत्वाची कमतरता आणि तणाव यांमुळे हिरड्यांमधून रक्त येऊ शकते.

रोजच्या आहारात भरपूर पालेभाज्या आणि फळांचा समावेश असावा.

हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी उपाय-

उपाय १

हिरड्यांमधून रक्तस्त्राव व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे देखील होऊ शकतो.

व्हिटॅमिन C ची कमतरता भरून काढण्यासाठी संत्री आणि किवी या फळांना आहारात समावेश करा.

उपाय २

कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा, ते हिरड्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.

कोमट पाण्याने गुळण्या केल्याने हिरड्यांमधून रक्त येण्याचे थांबते.

उपाय ३

ब्रश तुमच्या हिरड्या खराब करू शकतो,त्यामुळे मऊ ब्रिस्टल्स असलेले ब्रश विकत घ्या.

उपाय ४

तोंडाच्या अस्वच्छतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या होऊ शकते, त्यामुळे दिवसातून दोनदा ब्रश करा.

उपाय ५

तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमितपणे दंतवैद्याकडे जाणे महत्त्वाचे आहे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.