टोमॅटो म्हटल की, आपल्या डोळ्यासमोर लाल रंग येतो. पण तुम्हला माहितीये का? काळ्या रंगाचे देखील टोमॅटो असतात. लोक या टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणात करतात. काळ्या टोमॅटोमध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात अढळतात. कॅन्सरच्या रुग्णांसाठी हे टोमॅटो फायदेशीर मानले जातात. तसेच मधुमेच्या रुग्णांसाठी देखील हे टोमॅटो फायदेशीर ठरतात. डोळ्यांच्या समस्येसाठी काळे टोमॅटो फायदेशीर मानले जातात. कळ्या टोमॅटोचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते . पोट संबंधी कोणतीही अॅलर्जी असल्यास या टोमॅटोचे सेवन करावे. तुम्ही देखील या टोमॅटोची शेती करू शकतात.