पावसाळा आला की साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. यामुळे पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेणं थोडं अधिक गरजेचं होते.

पावसाळ्यातील आजारांना प्रतिबंध घालणे. पिण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी उकळलेले , गाळलेले पाणी वापरावे.

स्वच्छता राखल्याने पावसाळ्यात होणारा जंतुसंसर्ग टाळता येतो. पाणी आणि साबणाने सतत हात धुवत राहावे.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारखे डासांमुळे पसरणारे आजार होतात. डासांची उत्पत्ती कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत

रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजारांचा मुकाबला समर्थपणे करु शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळे, भाज्या आणि धान्याचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे.

पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या आजारांपासून बचावासाठी लसीकरण झालेले असणे हे देखील गरजेचे आहे. टिटॅनस, हेपेटायटीस आणि इन्फ्लुएन्झापासून बचावासाठी लसी घेणे फायदेशीर ठरते.

पावसाळ्यात खाण्या-पिण्याचे पदार्थ दूषित होण्याचा मोठा धोका असतो. यामुळे खाता-पिताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. पावसाळ्यात कच्च्या गोष्टी खाणे टाळावे.

पावसाळ्यात सुसज्ज असेल प्रथमोपचार किट जवळ असेल तर ते फायदेशीर ठरते. कधीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. त्याचा मुकाबला करण्यासाठी हे किट उपयोगी पडते.

तापाची कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडून तपासून घेतलं पाहिजे. पटकन वैद्यकीय मदत घेतल्यास आजार बळावण्याची शक्यता कमी होते आणि होणारा त्रासही टळतो.

पावसाळ्यात प्रवास करणार असाल तर हवामानाची योग्य ती माहिती ठेवली पाहिजे. त्यानुसार जी औषधे किंवा प्रकृतीला आवश्यक आहेत अशा गोष्टी सोबत बाळगल्या पाहिजेत.