ब्रिटीश काळात संस्थानांना त्यांची स्वायत्तता होती. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटीशांकडे होती. स्वातंत्र्यावेळी भारत आणि पाकिस्तान हे वेगळे झाले होते. पण भारत-पाकिस्तान मधील संस्थानांना ३ पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. पहिला पर्याय देण्यात आला होता की तुम्ही भारतात विलीन होऊ शकता. दुसरा पर्याय देण्यात आला होता तुम्ही पाकिस्तान मध्ये विलीन होऊ शकता. आणि तिसरा म्हणजे तुम्ही भारत किंवा पाकिस्तान मध्ये न जाता स्वतंत्र राहून स्वत:चे राज्य स्वत: चालवू शकता. म्हणजेच स्वत:चा वेगळा संसार थाटू शकतात. 'हैदराबाद, जुनागढ, आणि काश्मीर' संस्थानांबाबत भारतात पेच निर्माण झाला होता, तो नेहरू आणि सरदार पटेल यांनी सोडवला. 'हैदराबाद संस्थानात' पोलिस कारवाई करून, 'जुनागढ' मध्ये लोकमताने तर 'काश्मीर संस्थान' पाकिस्तान पासून संरक्षणाच्या कराराने भारतात विलीन करून घेतले.