मद्रास प्रांतामधून तेलगू भाषा बोलणाऱ्यांसाठी दुसरे राज्य करावे या मागणीसाठी पोट्टी श्रीरामुल्लू हे उपोषणासाठी बसले होते.



पण तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे भाषाधारीत राज्य निर्मितीच्या विरोधात होते.



बहुभाषिक राज्य असेल तर सर्व लोक एकत्र मिळून मिसळून राहतील असे नेहरूंना वाटत होते.



पण श्रीरामुल्लू यांच्या दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे त्यांचा मृत्यू झाला.



तेलगू भाषिकांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागले आणि सरकारला नमते घ्यावे लागले.



यातूनच भारतातील आंध्रप्रदेश हे तेलगू भाषिकांचे पहिले भाषाधारित राज्य बनले.



आंध्रप्रदेश च्या निर्मितीनंतर बाकी भाषिकांना देखील वेगळ्या राज्याची मागणी केली.



उदाहरणार्थ तत्कालीन बॉम्बे प्रांतातून मराठी भाषिकांनी महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती.



त्यामुळे सरकारला १९६० मध्ये मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरात या राज्यांची निर्मिती केली गेली होती.