पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या लक्षद्वीपच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी त्यांच्या लक्षद्वीपमधील दौऱ्याचे फोटो शेअर केलेत या दौऱ्यादरम्यानचे पंतप्रधान मोदींचे काही फोटो समोर आलेत. पंतप्रधान मोदी यांनी स्नॉर्कलिंग केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनी समुद्रसफारीचा आनंद देखील घेतला. त्याचबरोबर लक्षद्वीपमध्ये पंतप्रधान मोदी यांनी स्नॉर्कलिंगचा आनंद घेतला. पंतप्रधान मोदींनी या दौऱ्याचा आनंद लुटल्याचे या फोटोंमधून समजते. पंतप्रधान मोदींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यातील काही निसर्गरम्य फोटो सुद्धा शेअर केलेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन देखील हे फोटो शेअर केलेत.